भविष्याचा विचार करून नागरिक विविध बॅंकेच्या योजना, म्युचुअल फंड, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असतात. तुम्हीसुद्धा बचत सुरू करण्याचा विचार करत असाल तर भारतीय पोस्ट खात्याच्या विविध बचत योजना तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. विशेष म्हणजे सरकारी योजनेत गुंतवणूक करणे सर्वात जास्त सुरक्षित असते. आपण पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेविषयी जाणून घेऊया…
पोस्ट ऑफिस आरडी योजना म्हणजे काय?
- पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट (RD) योजनेत दर महिन्याला गुंतवणूक करून तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. यामध्ये तुम्ही प्रतिदिन ३३३ रुपयांच्या गुंतवणुकीद्वारे १० वर्षांमध्ये मोठा फंड तयार करू शकतात.
- १० वर्षांपेक्षा अधिक वय असलेली कोणतेही मूल किंवा प्रौढ व्यक्तीच्या नावे आपण पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत खाते उघडू शकतो. तुम्ही या खात्यात फक्त १०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.
- ही योजना ५ वर्षांनी मॅच्युअर होते. पोस्ट ऑफिस आरडी खाते पैसे जम न करता ५ वर्षे चालू ठेवता येते. १ वर्षांनंतर तुम्ही ५० टक्क्यांपर्यंत कर्जही घेऊ शकता.
अशाप्रकारे मिळतीय १६ लाख रुपये
जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत १० वर्षांसाठी दरमहा १० हजार रुपये गुंतवले तर १० वर्षांनंतर तुम्हाला ५.८ टक्के व्याजदराने १६ लाखांपेक्षा जास्त पैसे मिळतील. १० वर्षातील तुमची एकूण ठेव १२ हजार रुपये असेल तर तुम्हाला अंदाजे ४.२६ लाख परतावा मिळेल.
Join Our WhatsApp Community