गणपतीचे आगमन काही दिवसांवर आलेले असताना मुंबईत दादर परिसरात मोरपीस मोठ्या प्रमाणात विक्रीला आले आहेत. दादर छबीलदास मार्ग, सुविधा दुकान परिसर तसेच फुलमार्केटला मोरपीस विकणारी टोळी सर्रास आढळून येत आहे.
मुंबईत मोरपीस विक्री करणाऱ्या टोळीचा वनविभाग तपास करेल आणि पुढील कार्यवाही केली जाईल.
– गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक, ठाणे वनविभाग (प्रादेशिक)
शिकरीच्या वनगुन्ह्यांतर्गत तपास केला जातो
पाच दिवसांनी गणरायाचे आगमन होत असताना सजावटीसाठी मोरपिसांची बाजारात मोठया प्रमाणात मागणी दिसून येते. गणरायाच्या मूर्तीसह मोरपीस सजावटीसाठी वापरणे ही पारंपरिक पद्धत आहे. मात्र राष्ट्रीय पक्षी मोराचे पंख छाटून त्याची विक्री करणे हा वन्यजीव संवर्धन कायद्यानुसार गुन्हा समजला जातो. मोरपंखाची अवैध विक्री करणाऱ्या गुन्हेगारांना शिकरीच्या वनगुन्ह्यांतर्गत तपास केला जातो. मुंबईत दादर परिसरात मोरपीस विकणारी टोळी तीन ते चार लोकांमध्ये विभागली गेली आहे. या टोळीतील माणसे एकमेकांपासून जवळ राहूनच मोरपीस विक्रीचा व्यवसाय करत आहेत.
(हेही वाचा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा द्वेष करणाऱ्या संभाजी ब्रिगेडसोबत शिवसेनेची सलगी!)
मोर हा राष्ट्रीय पक्षी वन्यजीव संवर्धन कायदा 1972 नुसार पहिल्या वर्गवारीत संरक्षित आहे. मोरपीस विक्री रोखण्यासाठी केंद्रीयपातळीवर कायद्यात बदल घडणे आवश्यक आहे.
– रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक, सातारा वनविभाग