श्री गणरायांचे आगमन येत्या ३१ सप्टेंबर होती होत असून या गणेशोत्सवाकरता सार्वजनिक उत्सव मंडळांनी मंडपांकरता महापालिकेकडे अर्ज केला आहे. गणेशोत्सवाच्या मंडपांना परवानगीसाठी महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमध्ये सादर झालेल्या एकूण ३४८७ अर्जांपैंकी आतापर्यंत २२२० मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. तर आतापर्यंत ५६२ डूप्लिकेट अर्ज प्राप्त झाले असून विविध कारणांमुळे ४७४ मंडळांची परवानगी नाकारण्यात आली आहे.
( हेही वाचा : ‘ब्रिगेड’शी संग केल्यामुळे शिवसेनेच्या जातीभेदविरहीत हिंदुत्त्वात येईल अडथळा – चंद्रशेखर साने)
गणेश उत्सव मंडळांकडून ३८८७ अर्ज प्राप्त
मुंबईतील उत्सवांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप बांधण्यासाठी परवानगी देण्याची प्रक्रिया देण्यात येतात. सर्वसाधारणपणे दोन महिने आधीच या परवानग्या मंडपांना दिल्या जातात. उच्च न्यायालयाच्या व महाराष्ट्र शासनाच्या विविध आदेशांच्या अधिन राहून मान्यता गणेशोत्सव मंडळांना मंडपासाठी परवानगी देण्यात येते. मंडप परवानगीसाठी महापालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयांत ऑनलाईन एक खिडकी योजना सुरु करण्यात येते आणि गणेशोत्सव मंडळांकडून अर्ज प्राप्त झाल्यापासून सामान्यपणे पाच दिवसांच्व्या आत मंडप बांधण्यासाठी परवानगी देण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाच्यामाध्यमातून सुरु आहे. यापूर्वीच्या उत्सव मंडळांना जुन्याच परवानगीच्या आधारे अर्जांना देण्यात येतात तर नवीन गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्याकरता स्थानिक पोलिस स्टेशन, सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) आणि संबंधित महापालिका उपायुक्त यंची मान्यता घेणे बंधनकारक आहे.
आतापर्यंत गणेश उत्सव मंडळांकडून ३८८७ अर्ज प्राप्त झाले आहेत. यात ५६२ अर्ज हे डुप्लिकेट आढळून आले आहे. त्यामुळे २९२५ मंडळांच्या अर्जांची छाननी करण्यात आली असून त्यातील २२२० अर्जांना मान्यता देत परवानगी देण्यात आली आहे. तर ४७४ मंडळांची परवानगी विविध कारणांमुळे नाकारण्यात आली आहे. तर २३१ मंडळांच्या अर्जांच्या मंजुरीची प्रक्रीया सुरु असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community