कोरोना काळात लहान मुलांमध्ये स्थूलतेचा आजार लक्षणीय प्रमाणात वाढला आहे. हा आजार अद्यापही मुलांमध्ये दिसून येत आहे. मुलांमध्ये अगोदरपासून उच्च रक्तदाब आणि थायरॉडची समस्या असल्यास स्थूलतेचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. मुलांमध्ये उच्च रक्तदाब आणि थायरॉडचा आजार गेल्या काही वर्षांत सर्वसामान्य झाला आहे, या दोन आजारांनी ग्रासलेल्या लहान मुलांमध्ये स्थूलता अद्यापही मोठ्या संख्येने दिसून येत आहे. त्यावर तातडीने तपासण्या आवश्यक असल्याचे डॉक्टर सांगतात.
मुलांमध्ये उच्च रक्तदाब, थायरॉईड
लहान मुलांमध्ये स्थूलतेचा आजार दिवसेंदिवस गंभीर स्वरूपात दिसून येत आहे. मुलींमधील मासिक पाळीचे वय गेल्या दोन वर्षांत आठ आणि दहा वर्षांवर आले आहे. मुलींमधील वाढत्या वजनामुळे आता पाळीचे वय दहा वर्षांच्याही खाली आले आहे. या समस्यांवर औषधोपचारापेक्षा प्रामुख्याने मैदानी खेळावरच भर देण्याचा आग्रह डॉक्टर करत आहे. लहान मुलांना स्थूलतेच्या समस्येवर उपाय म्हणून तातडीने औषधे देता येत नाहीत. मुलांमध्ये अगोदरपासूनच उच्च रक्तदाब, थायरॉईड आदी आजार असल्यास स्थूलतेवर औषध दिले जाते. किशोरवयीन मुलांना स्थूलतेवर औषधे दिली जातात, त्याअगोदरच्या वयातील मुलांना सर्रास स्थूलतेच्या समस्येवर उपाय म्हणून औषधे देणे योग्य नाही, अशी माहिती जेजे समूह रुग्णालयाच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. बेला वर्मा यांनी दिले.
अन्नपदार्थांच्या दर्जाची नियमित तपासणी करण्याची मागणी
होमिओपॅथीक फिजिशीयन डॉ. संजय दप्तरदार यांनीही मुलांचा आहार आणि व्यायामाकडे लक्ष केंद्रित कारण्याकडे पालकांनी लक्ष द्यावे असा सल्ला दिला. याबाबतीत सरकारनेही फास्टफूड कंपन्यावर निर्बंध घालत अन्नपदार्थांच्या दर्जाची नियमित तपासणी करण्याची मागणी केली. आम्ही स्थूल मुलांमध्ये भूक मंदावण्याची औषधे देतो. मुलांमध्ये स्थूलता वेळेवर नियंत्रणात आणणे गरजेचे असल्याचेही डॉ. दप्तरदार म्हणाले.
Join Our WhatsApp Community