फुटबाॅल प्रेमींसाठी आनंदाची बातमी; FIFA ने उठवली बंदी, वर्ल्डकप होणार भारतात

228

फुटबाॅलची जागतिक संघटना फिफाने अखिल भारतीय फुटबाॅल महासंघावर बंदी घातली होती. त्यामुळे जोपर्यंत हा बॅन उठवला जात नाही, तोपर्यंत भारतीय फुटबाॅल संघ कोणतेही सामने खेळू शकणार नव्हता. अखेर टीम इंडियावर घातलेली बंदी शनिवारी उठवण्यात आली आहे. फिफाच्या समितीमधील सदस्यांनी 25 ऑगस्टपासून ही बंदी उठवल्याचे जाहीर केले. त्यामुळे भारतीय चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. यंदाचा महिला अंडर 17 विश्वचषकही आता भारतात होणार आहे.

महिलांचा अंडर 17 वर्ल्ड कप येत्या ऑक्टोबरमध्ये भारतात होणार होता. मात्र, बंदीमुळे तो देखील फिफाने हिसकावून घेतला होता. परंतु आता मात्र बंदी उठल्याने, हा वर्ल्ड कप भारतातच होणार आहे.

( हेही वाचा: दर सहा महिन्यांनी आपला देश बदलणारे ‘हे’ ऐतिहासिक बेट माहितीय का? )

तिस-या पक्षाने अनावश्यक हस्तक्षेप केल्याचे कारण देत फिफाने काही दिवसांपूर्वीच हा कठोर निर्णय घेता होता. भारतीय महासंघावरील बॅन आता तत्काळ प्रभावाने लागू होत असल्याचे फिफाने म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.