ई-श्रम कार्ड कोण कोण बनवू शकतो आणि त्याचे फायदे, जाणून घ्या

166

देशातील अनेक मजदूर आणि कामगार आहेत जे आजही अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत करत आहेत. त्यांचा हवा तसा विकास होत नाही. त्यामुळे अशाच दुर्लक्षित झालेल्या कामगार तसेच मजदूर वर्गाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारने श्रमिक वर्गासाठी सुरु केलेल्या एका विशेष योजनेविषयी म्हणजेच ई -श्रम कार्डविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया.

काय आहे ई- श्रम कार्ड?

ई-श्रम कार्ड ही केंद्र सरकारकडून सुरु केलेली एक योजना आहे. जिच्याद्वारे असंघटित क्षेत्रात राहत असलेल्या कामगारांपर्यंत, मजदुरांपर्यंत सामाजिक सुरक्षेची योजना पोहचवणे, त्यांच्या डेटाला राष्ट्रीय स्तरावर एकीकृत करणे, श्रमिकांना सरकारच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देणे इत्यादी कार्ये ई- श्रम कार्डद्वारे पार पाडली जाणार आहेत.

ई-श्रम कार्डचे फायदे काय?

  • ई -श्रम कार्ड हे आपल्या आधार कार्डसोबत लिंक करण्यात आले आहे.
  • असंघटित क्षेत्रात राहत असलेल्या काम करत असलेल्या कामगारांपर्यंत, मजदुरांपर्यंत सामाजिक सुरक्षेची योजना पोहचवणे, त्यांच्या डेटाला राष्ट्रीय स्तरावर एकीकृत करणे हा यामागील सरकारचा हेतू आहे.
  • ई -श्रम कार्ड प्राप्त झाल्यास आपण सरकारच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरत असतो.
  • ई- श्रमवर नोंदणी केल्यानंतर जर समजा आपला अपघात झाला आणि आपण त्यात मृत झालो तर आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून दोन लाखापर्यंतची नुकसान भरपाई दिली जात असते. समजा आपण अपघातात दगावलो नाही पण आपल्याला काही शारिरीक अपंगत्व आले तर अशा परिस्थितीतदेखील आपणास एक लाखापर्यंत नुकसान भरपाई मिळत असते.
  • ई- श्रम कार्ड ह्या योजनेचा लाभ कोण घेऊ शकणार
  • ई -श्रम कार्ड ह्या केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ भारत देशातील सर्व असंघटित क्षेत्रात कार्य करत असलेल्या श्रमिक वर्गाला म्हणजे कामगार तसेच मजदूर व्यक्तीला ह्या योजनेला लाभ उठवता येणार आहे.

( हेही वाचा: ‘सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली’: मनसेचे शिवसेनेवर टीकास्त्र )

ई श्रम कार्ड ह्या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकणार नाही

ईपीएफओ, ई. एस. आय. एसची मेंबरशीप असणारी कुठलीही व्यक्ती ह्या योजनेसाठी नोंदणी करुन हिचा लाभ घेऊ शकत नाही.

असा करा कर्ज

ई- श्रम कार्ड ह्या केंद्र सरकारने सुरु केलेल्या योजनेत सहभागी होण्यासाठी आपण दोन पद्धतीने अर्ज करु शकतो.

  • ऑनलाईन पद्धतीने
  • ऑफलाईन पद्धतीने
    (Https://Www.Eshram.Gov.In/)

असंघटित क्षेत्रातील श्रमिक वर्गामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो

  • मासेमारी करणारा मजदूर तसेच कामगार वर्ग
  • पशुपालन व्यवसाय करत असलेले मजदूर तसेच कामगार वर्ग
  • इमारत बांधण्याचे काम करणारे मजदूर कामगार
  • विणकाम करणारे मजदूर
  • वीटभट्टीत काम करणारे मजदूर
  • मीलमध्ये काम करणारे कामगार

महत्त्वाची कागदपत्रे कोणती ?

ई -श्रम कार्ज नोंदणी करण्यासाठी लागणारी काही महत्त्वाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

  • आधार कार्डची झेराॅक्स
  • बॅंकेचे खाते पासबूक
  • रेशन कार्डची झेराॅक्स
  • संपर्कासाठी मोबाईल नंबर
  • लाईट बीलची झेराॅक्स
  • मोबाईल नंबर
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.