गणपती मंडळ स्पर्धा : सरकारकडून बक्षिसांचा वर्षाव; प्रत्येक जिल्ह्यातून निवडली जाणार ३६ मंडळे

160

शिंदे – फडणवीस सरकारने दहीहंडीनंतर आता गणेशोत्सव काळात सुद्धा सरकारकडून विविध बक्षीसे देण्यात येणार आहेत. राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना २५ हजार रुपयांपासून ५ लाख रुपयांपर्यंत बक्षीसे देण्यात येणार आहेत.

( हेही वाचा : अहमदाबादचा अटल पूल पाहिलात का? पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन! )

राज्य स्तरावर होणाऱ्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी निकष

  • पर्यावरणपूरक मूर्ती
  • पर्यावरणपूरक सजावट ( थर्मकोल, प्लॅस्टिक वगळून )
  • ध्वनीप्रदूषण विरहित वातावरण
  • अंधश्रद्धा निर्मूलन
  • स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भात देखावा किंवा सजावट
  • पारंपरिक खेळांच्या स्पर्धा

पहिल्या क्रमांकाच्या मंडळाला ५ लाख रुपयांचा पुरस्कार

या आधारावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड केली जाणार आहे. राज्य शासनाच्या वतीने पहिल्यांदाच राज्यस्तरावर स्पर्धा होऊन तीन उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची निवड केली जाणार आहे. त्यातील पहिल्या क्रमांकाच्या मंडळाला ५ लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या मंडळाला २ लाख ५० हजार रुपये व तिसऱ्या क्रमांकाच्या मंडळाला एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यातून ३६ मंडळांची शिफारस केली जाणार आहे. त्यातून पहिल्या तीन क्रमांकाच्या मंडळांना वगळून उर्वरित ३३ मंडळांनाही प्रत्येकी २५ हजार रुपये आणि प्रमाणापत्र देण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.