उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत युती केल्याची घोषणा केल्याबरोबर उद्धव ठाकरे यांच्या चारही बाजूने टीकेची झोड उगारली जाऊ लागली आहे. वैचारिक पातळीवर ही युती कशी विरोधासी आहे, असे अनेक जण सांगत असेल तरी भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी मात्र ही युती अजिबात अनैसर्गिक नाही, ती नैसर्गिक आहे, असे उदाहरणासह स्पष्ट केले आहे.
उद्धव ठाकरे आणि ब्रिगेडमध्ये समान धागा
याविषयी भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे. त्यामध्ये आमदार भातखळकर म्हणाले की, खोटा इतिहास सांगण्याचे आणि थापा मारण्याचे कौशल्य हा उद्धव ठाकरे आणि ब्रिगेड मधला समान धागा आहे. त्यामुळे हे युती नैसर्गिक आहे, असे आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा ई-श्रम कार्ड कोण कोण बनवू शकतो आणि त्याचे फायदे, जाणून घ्या)
अहो @BhatkhalkarA जी, किती धूर निघावा तो. अहो ही युती महाराष्ट्राच्या मातीतील लेकरांशीच केली आहे, हे ध्यानी असू द्या! सत्तेत जाण्यासाठी मेहबूबा मुफ्ती यांच्यासारख्या लोकांशी युती करण्याची आमच्यावर अजून वेळ आली नाही.#शिवसेना #महाराष्ट्र pic.twitter.com/X3zDqz2QhC
— Ambadas Danve (@iambadasdanve) August 26, 2022
तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यावर टीका करताना सांगितले की, ‘अहो भातखळकरजी, किती धूर निघावा तो. अहो ही युती महाराष्ट्राच्या मातीतील लेकरांशीच केली आहे, हे ध्यानी असू द्या! सत्तेत जाण्यासाठी मेहबूबा मुफ्ती यांच्यासारख्या लोकांशी युती करण्याची आमच्यावर अजून वेळ आली नाही.’
Join Our WhatsApp Community