बेस्टने ज्यांच्याबरोबर करार केला आहे त्या कंपन्या कामगारांचा पैसा देत नाहीत असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. मुंबई महापालिकेत अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे आणि आदित्य ठाकरेंच्या वरदहस्तानेच अनेक कंत्राट गुजराती कंपन्यांना देण्यात आले आहेत असा आरोप मनसेने केला आहे.
( हेही वाचा : सातव्या वेतन आयोगासाठी पीएमपीच्या कर्मचारी आग्रही; आंदोलनाचा इशारा)
मराठीचा पुळका आणता मग कर्मचाऱ्यांना न्याय का देत नाही – देशपांडे
बेस्टमधील कंत्राटी कामगारांचे पैसेही, थकीत देणी दिली नाहीत या स्थितीसाठी जबाबदार कोण असा सवाल संदीप देशपांडेंनी केला आहे. बेस्ट हा भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे पाच डेपोचे कंत्राटी कर्मचारी आले त्यांना जवळपास वर्षभर पगार नाही ही गंभीर बाब असून यापैकी एका कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला, सणासुदीच्या काळात सुद्धा कामगारांकडे पैसै नाही. बेस्टने ज्या कंपन्यांसोबत करार केला आहे त्या कामगारांचा पैसा देत नाही असा आरोप देशपांडेंनी केला आहे. मराठी कर्मचाऱ्यांची उपासमार होत असून गुजराती कंपन्यांना मातोश्रीतून कंत्राट दिलं जातंय, मराठीचा पुळका आणता मग कर्मचाऱ्यांना न्याय का देत नाही असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.
५ सप्टेंबरपर्यंत अल्टिमेटम
येत्या काळात मनसे महापालिकेतील भ्रष्टाचार समोर आणणार आहे. रोडसंदर्भातही काही पुरावे मनसेच्या हाती लागले आहेत, व्यवस्थापक सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहेत. आता ५ सप्टेंबरपर्यंत आम्ही अल्टिमेटम देत आहोत असा इशारा मनसेच्या संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
Join Our WhatsApp Community