यंदा एसटीने दीड लाख गणेशभक्त कोकणात जाणार

140

गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने सोडलेल्या गणपती स्पेशल जादा गाड्यांना चाकरमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सुमारे ३ हजार ४१४ गाड्या फुल झाल्या आहेत. यापैकी १ हजार ९५१ गाड्यांना ग्रुप बुकिंगचे प्राधान्य मिळाले आहे. या सर्व गाड्यांमधून जवळपास दीड लाख गणेशभक्त कोकणाकडे होणार रवाना होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

( हेही वाचा : आदित्य ठाकरे असल्याचे भासवून मागितली २५ हजारांची रक्कम)

गणपती व कोकणातील चाकरमान्यांचे अतुट नाते आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटानंतर यंदा मोठ्यासंख्येने चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणकडे रवाना होत आहेत. त्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड तसेच पुणे येथून २ हजार ५०० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत तब्बल ३४१४ गाड्यांचे आरक्षण फुल झाले आहे. या गाड्यांमधून सुमारे १.५० लाखांहून अधिक चाकरमानी प्रवास करणार आहेत. , असे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेल्या लालपरीला सुरक्षित प्रवास म्हणून प्राधान्य दिल्याने चन्ने यांनी चाकरमान्यांचे आभार मानले.

सुरक्षित प्रवावासाठी विशेष खबरदारी

दरम्यान, गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या जादा वाहतूकीची सेवा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी महामंडळाने विशेष लक्ष केंद्रीत केले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी फिरती गस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी व सुरक्षित-सुरळीत वाहतूकीसाठी गस्ती पथके विशेष दक्षता घेणार आहेत. याशिवाय कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरूस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.