नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने शुक्रवारी रात्री घाटकोपर परिसरातून एका जिम ट्रेनरला अटक केली आहे. या जिम ट्रेनर कडून एनसीबीने मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज जप्त केले आहे.
( हेही वाचा : मोटे यांच्या खांद्यावरील मालमत्ता कराचा भार महेश पाटील यांच्या अंगावर)
ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटमध्ये सामील असल्याचा संशय
शुभम भगत असे अटक करण्यात आलेल्या जिम ट्रेनरचे नाव आहे. घाटकोपर पश्चिम किरोळ गाव या ठिकाणी राहणारा शुभम हा जिम ट्रेनर आहे. शुक्रवारी सायंकाळी एनसीबीच्या मुंबई विभागाने घाटकोपर येथून शुभम याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळून एलएमडी पेपर, उच्च प्रतीचा गांजा, चरस, हसिश इत्यादी अमली पदार्थ जप्त करण्यात केले आहेत. शुभम हा ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटमध्ये सामील असल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्या अनुषंगाने त्याच्याकडे तपास सुरू असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे.
या प्रकरणी एनसीबीने गुन्हा दाखल केला असून शुभमला अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले गेले, न्यायालयाने शुभमला दोन दिवसांची एनसीबी कोठडी सुनावली आहे.
Join Our WhatsApp Community