आर्थिक झळ बसू नये म्हणून वारणा दूध संघाने १ सप्टेंबरपासून गायीच्या खरेदी दुधास प्रतिलिटर २ रुपये प्रमाणे वाढविण्यचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. पशुखाद्य, चाऱ्याची टंचाई आणि वाढलेले दर या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी वारणा दूध संघाने गायीच्या खरेदी दूधास प्रतिलिटर २ रूपये दरवाढ देण्याची घोषणा अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी केली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ मिळाल्याने दूध उत्पादकांनी समाधान व्यक्त केले आहे.
अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे म्हणाले की, दूध उत्पादकांना वैरण टंचाईसह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ही समस्या सूटावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. वारणा दूध संघाची दही, लस्सी, ताक, दूध या दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत मोठी वाढ झाली असून वारणा श्रीखंडाची या वर्षी विक्रमी विक्री केली आहे. तर वारणा दूध संघाने महापूर, अवकाळी पाऊस अशा अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. अल्पदरात पशुवैद्यकीय सेवा, विमा सुरक्षाकवच व रेडी संगोपन यांसारखे अनेक उपक्रम संघामार्फत राबविले जात असल्याचे दूध संघाकडून सांगितले जात आहे.
(हेही वाचा – महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी घडविल्या शाडू मातीच्या गणेशमूर्ती)
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात गायीच्या दूधाचा दर आता ३० वरून ३२ वर पोहोचला आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना नेहमी सवलती आणि सुविधा देणारे वारणा दूध दरातही परंपरेप्रमाणे क्रमांक एकवर आहे.
Join Our WhatsApp Community