शिंदे गटातील ‘या’ बड्या नेत्याला कोरोना; ट्वीट करत दिली माहिती

144

शिवसेनेतून बंडखोरी करत संजय राठोड शिंदे गटात सहभागी झाले. शिंदे गटात सामील झाल्यानंतर त्यांना मंत्रीपद देण्यात आले. शिंदे गटात आल्यानंतर मंत्री झाल्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला होता. याच वादग्रस्त नेत्याला कोरोनाने आपल्या विळख्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.

(हेही वाचा – कोकणात जाणाऱ्यांसाठी ‘मनसे’तर्फे ST च्या ‘शिवशाही’ एसी बसची FREE सेवा!)

संजय राठोड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांनी स्वतःच ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमधील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र कोरोनाची लक्षणे नसल्यामुळे ते घरीच क्वारंटाईन झाले आहेत. त्यांच्यावर घरातच औषधोपचार सुरू आहेत. याचबरोबर त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले आहे.

काय केले ट्वीट

शनिवारी सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबई येथे कोरोना चाचणी केली. व ती पॉझिटिव्ह आली. डॉक्टरांनी मला लक्षणे नसल्यामुळे घरीच क्वारंटाईन व्हायला सांगितलेले आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांना काही त्रास किंवा लक्षणे असेल तर त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी ही विनंती’. असे ट्वीट संजय राठोड यांनी केले आहे.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. त्यानंतर ठाकरे सरकारमध्ये त्यांना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. असे असतानाही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांना पुन्हा एकदा मंत्रीमंडळात स्थान देण्यात आल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.