नोएडातील सुपरटेकचे ट्विन टॉवर हे अखेर रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जमीनदोस्त करण्यात आले आहेत. अवघ्या काही सेकंदांत कुतूबमिनारपेक्षाही उंच असलेले टॉवर अखेर पाडण्यात आले आहेत. अवघ्या काही सेकंदांच्या आत हे टॉवर जमीनदोस्त करण्यात आले आहेत.
हे टॉवर उभारताना सुपरटेक बिल्डर्सकडून अनेक नियम पायदळी तुडवण्यात आले होते. त्यामुळे याबाबत सर्वोच्च न्यायालयात गेल्या आठ वर्षांपेक्षा जास्त काळ याबाबत खटला चालू होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी हे टॉवर पाडण्याची कारवाई करण्यात आली आहे. हे टॉवर जमीनदोस्त झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात प्रचंड धुळीचे लोट उठले आहेत.
काही सेकंदांत टॉवर जमीनदोस्त
नोएडातील सेक्टर 93ए मध्ये एपेक्स आणि सियेन असे ट्विन टॉवर बांधण्यात आले होते. यातील एपेक्स टॉवरची उंची 102 मीटर तर सियेन टॉवरची उंची 95 मीटर इतकी होती. हे टॉवर उभारताना अनेक नियम धाब्यावर बसवण्यात आले होते. त्यामुळे आधी उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात याबाबत खटला चालू होता. सर्वोच्च न्यायालयाने हे टॉवर पाडण्याचे आदेश दिले होते. इतके उंच टॉवर पाडण्याची देशातील ही पहिलीच वेळ असल्याने याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
#WATCH | Once taller than Qutub Minar, Noida Supertech twin towers, reduced to rubble pic.twitter.com/vlTgt4D4a3
— ANI (@ANI) August 28, 2022
या तंत्राचा वापर
भर वस्तीत हे टॉवर असल्यामुळे ते पाडणं प्रशासनाच्या दृष्टीने आव्हानात्मक होतं. त्यासाठी एडफिस इंजिनीअरिंगने वॉटर फॉल इम्ल्पोजन तंत्रानुसार हे टॉवर सुरक्षितपणे पाडण्यात आले आहेत. ही कारवाई करताना आसपासच्या परिसरात राहणा-या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलो होते. या कारवाईदरम्यान कोणतीही जीवित किंवा इतर हानी झाली नसून परिसरात मात्र मोठेच्या मोठे धुळीचे लोट उठले आहेत.
Join Our WhatsApp Community