BEST युनियनच्या नवीन सभासद नोंदणीसाठी नितेश राणेंचे आवाहन

154

समर्थ बेस्ट कामगार संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासाठी संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी विशेष सूचना केल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात बेस्ट मध्ये सर्व युनियनच्या नवीन सभासद नोंदणीसाठी कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या सभासद नोंदणीसाठी सर्वांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले आहे.

नितेश राणे यांचे आवाहन

बेस्ट मध्ये सर्व युनियनच्या नवीन सभासद नोंदणीचा व रद्दबातल करण्याचा कार्यक्रम 1 सप्टेंबर 2022 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत असून आपण सर्वांनी या संधीचा फायदा घ्यावयाचा आहे, असे आवाहन नितेश राणे यांच्यामार्फत करण्यात आले आहे. आपल्या देशात व राज्यातही आता भाजपचे सरकार कार्यरत आहे, त्यामुळे भविष्यात आपल्यालाच चांगल्या संधी मिळणार आहेत. आपण बेस्टच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन बेस्ट कामगारांच्या समस्या मांडल्या. त्यानंतरच बेस्टची थकीत देणी देण्यास प्रशासनामार्फत सुरुवात करण्यात आली.

आपण सर्वांनी आपल्या सभासदांना बेस्टमधील अन्य युनियनचे सभासदत्व असल्यास ते रद्द करून आपल्या युनियनचे सभासद अर्ज भरून घ्यावयाचा आहे आणि जास्तीत जास्त कामगारांना सभासद करून घ्यायचे आवाहन नितेश राणे यांच्यामार्फत करण्यात आले आहे. लवकरच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत आपली एक जाहीर बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.