पुढच्या वर्षी २०२३ मध्ये श्रावणानंतर अधिक महिना येणार असल्याने गणपती बाप्पाचे आगमन १९ दिवस उशिरा होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी मंगळवारी १९ सप्टेंबर २०२३ रोजी बाप्पांचे आगमन उशिराने होणार आहे.
(हेही वाचा – गणेशोत्सवादरम्यान ‘BEST’ कडून ‘निलांबरी’ बससेवा! काय आहेत वैशिष्ट्य?)
यंदा गणेश चतुर्थी ३१ ऑगस्ट २०२२ रोजी असणार आहे तर ९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. श्री गणेश पूजनासाठी मध्यान्ह काळ महत्त्वाचा मानला जातो. बुधवारी ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११.२५ पासून दुपारी १.५५ पर्यंत मध्यान्ह काळ आहे. जर यावेळेस गणेशपूजन करणे शक्य झाले नाही तर संपूर्ण दिवसभर कधीही गणेश पूजन केले तरी चालणार असल्याचे पंचागकर्ते व खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी दिली आहे.
(हेही वाचा – “गणपती बाप्पा मोरया”च्या गजरात ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणात रवाना)
यासह ज्येष्ठा गौरी शनिवारी ३ सप्टेंबर रोजी रात्री १०.५६ वाजेपर्यंत अनुराधा नक्षत्र असल्याने दिवसभर कधीही गौरी आणण्यास हरकत नाही. रविवारी ४ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी पूजन आहे. ज्येष्ठा गौरींचे विसर्जन चंद्र मूळ नक्षत्रात असल्याने सोमवारी ५ सप्टेंबर रोजी रात्री ८.०५ पर्यंत करावे. शुक्रवारी ९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे.
Join Our WhatsApp Community