‘जयपोर’च्या साथीने उत्सवाला रंगत,गणेश चतुर्थी संग्रहाचे अनावरण

322

गणेश चतुर्थी हा पवित्र हिंदू उत्सव असून अतिशय उत्साहात साजरा करण्यात येतो. आनंददायक आणि भक्तिमय वातावरणात घरी मित्र-परिवाराला वेळ दिल्याने सणाची रंगत वाढते. उत्सवाची झगमग लक्षात घेऊन जयपोरने पेहराव आणि घरगुती सजावटीचे पर्याय एकाच ठिकाणी तुमच्या सर्व उत्सवी गरजांनुरूप उपलब्ध करून दिले आहेत. मातीतले रंग, ठाशीव डिझाईन आणि अभिनव नजाकतीचे संग्रह उत्सवाकरिता साजेशी आहे.

जयपोर लेबल हे कलाकार आणि कारागीर यांच्या समवेत सर्वोत्तम घडणावळ, नक्षीकाम आणि डिझाईन तसेच ग्राहकांना हटके मूल्य देणाऱ्या संग्रहासह उपलब्ध आहे.

गणेश चतुर्थीसाठी तयार करण्यात आलेले खास कलेक्शन

जयपोर अग्रीमा

शरीरावर उठून दिसणाच्या चौकट्या आणि विणकाम केलेल्या किंवा जरीचा काठ असलेल्या पदराने सजलेली नारायण पेठ साडी तेलंगणा शहरात तयार करण्यात आली आहे. पहिले नारायण पेठ विणकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताफ्यासह या प्रदेशात आल्याची आख्यायिका आहे.

jaypor model

जयपोर राबीबा

राणी अहिल्याबाई होळकर यांच्या आग्रहाखातर पहिली महेश्वरी साडी तयार करण्यात आली. या साडीचा उभा धागा सिल्क आणि आडवा धागा सुती असतो आणि हिरा, रुईचे फूल आणि काजवा अशी सुंदर नावे असलेले विणकाम त्यावर केले जाते.  जयपोरच्या रत्नजडीत राबीबा कलेक्शनमध्ये एखाद्या राणीला साजेशा असलेल्या महेश्वरी साडीमध्ये अशा आणि आणखी अनेक नक्षीकामाचा आनंद द्या.

jaypor model 2

 

जयपोर धातू

आपल्या घरातील सकारात्मक कंपने आणि पितळेच्या भांड्यांच्या वापरामुळे होत असलेल्या फायद्यांच्या परंपरेचा सन्मान करण्यासाठी जयपोरने सुंदर पितळी शोभेच्या वस्तूंचा संचच आणला आहे.  ‘धातू’ मध्ये अस्सल दक्षिण भारतीय पितळी उरळी, धुनी, तेलाचे दिवे, वाद्ये आणि इतर अनेक वस्तू तसेच मोहक गणेश मूर्ती आहेत.

jaypor jwellry 2

जयपोर आबाद

भाजल्यासारख्या रंगाच्या पितळी वस्तूंचे एक आंतरिक मूल्य असते आणि प्राचीन काळापासूनच तेजस्वी तरीही गावरान आकर्षण असलेला हा धातू घरात पावित्र्य आणतो, अशी भारतीय संकल्पना आहे.  नक्षीकाम असलेले पितळी दिवे, उदबत्तीचे घर, प्रभावळी, चमचे आणि इतर ‘आबाद’ वस्तू त्यांच्या मोहकतेने आपल्या सभोवतालचे वातावरण प्रसन्न करतात.

jaypor jwellery

https://www.jaypore.com/ या वेबसाईटला भेट देऊन ऑनलाई खरेदी करू शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.