राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूर्वी रिक्षा चालवायचे. त्यांना रिक्षा चालवण्याचा अनुभव होता म्हणूनच आज त्यांच्या हाती महाराष्ट्राचे स्टेअरिंग आल्याचे खासदार तथा मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. सारथी योग्य असला की, प्रवासही योग्य दिशेने होतो , असे म्हणत काहींचे सारथी चुकीचे निघाल्याने, ते भरकटले असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेवर खोचक टीका केली.
मागच्या अडीच वर्षात महाराष्ट्राचा प्रवास चुकीच्या दिशेने सुरु होता. कारण तीन चाकी रिक्षाचा सारथीच योग्य नव्हता, असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीवर आणि त्यामधील प्रमुख नेत्यांवर सडकून टीका केली आहे. आता हिंदूचे सण उत्सव बिनधास्त साजरे करण्यास मोकळीक मिळत आहे. शिवाय राज्याचा विकासही योग्य दिशेने असल्याचे, प्रमुख कारण म्हणजे राज्याचे स्टेअरिंग हे योग्य सारथीच्या हाती आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न त्वरित मार्गी लागत असल्याने ‘हे सरकार आपले’ अशी भावना वाढत आहे. शिवाय ज्या उद्देशाने सरकार स्थापन झाले तो उद्देश साध्य होत असल्याचे, श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे.
( हेही वाचा: अखेर काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष, या तारखेला होणार अध्यक्षपदाची निवडणूक )
Join Our WhatsApp Community