सर्वसामान्यांना फटका; एक सप्टेंबरपासून दूध महागणार

136

अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ केल्यानंतर, मुंबईत आता 1 सप्टेंबरपासून सूटे दूध 7 रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे एक लिटर दुधासाठी 80 रुपये मोजावे लागणार आहेत. चा-याचे दर दुप्पट झाले आहेत.

तूर, हरभ-याच्या किमती 15 ते 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे दरवाढ केल्याचे अध्यक्ष सी.के.सिंह आणि संयोजक कासम काश्मीर यांनी सांगितले. संघाची रविवारी बैठक झाली. ही भाववाढ 1 सप्टेंबर 2022 पासून 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू असेल.

( हेही वाचा: ‘पुढचे पाच वर्ष न्यायालयाचा निकाल लागणार नाही’, शिंदे गटाच्या आमदाराचे सूचक विधान )

सणासुदीच्या काळात महागाईचा भडका

एकीकडे दुध महागले असताना, आता दिवळीपर्यंत पोहे, चिवडा हा फराळही महागणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पोहे, भाजके पोहे, दगही पोहे, पातळ पोहे, भडंग, मुरमु-याच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात गेल्या तीन महिन्यांत पोहे, भडंग, मुरमु-याच्या दरात वाढ झाली आहे, किरकोळ बाजारात गेल्या तीन महिन्यांत पोहे, भडंग, मुरमु-यांच्या दरात किलोमागे सरासरी पाच ते सहा रुपयांनी वाढ झाली आहे. कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे ही दरवाढ झाली असून, ही तेजी दिवाळीपर्यंत कायम राहील, असे व्यापा-यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.