‘सागर’ बंगल्यावर राज ठाकरे-फडणवीसांची खलबतं, तासभरची चर्चा गुलदस्त्यात

142

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भेट घेतली. सागर बंगल्यावर झालेल्या दोघांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सागर बंगल्यावर साधारण तासभर दोघांत खलबंत सुरू होती, मात्र त्यांच्यात झालेली चर्चा अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे त्यांच्या कोणत्या विषयावर चर्चा झाली याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे सोमवारी सकाळी ८ वाजता देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचले. यावेळी फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात तासभर चर्चा रंगली. दरम्यान, अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने गणपती दर्शनाला घरी येण्याचे आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे फडणवीसांच्या निवासस्थानी दाखल झाल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – ‘सागर’ बंगल्यावर राज ठाकरे-फडणवीसांची खलबतं, तासभरची चर्चा गुलदस्त्यात)

यावेळी राज्याची राजकीय परिस्थिती आणि मुंबई-ठाण्यासह राज्यातील इतर महापालिका निवडणुकीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, येत्या ५ सप्टेंबर रोजी भाजप नेते अमित शाह मुंबई दौऱ्यावर आहे. त्यानंतर येणाऱ्या आठवड्यात भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा देखील मुंबईच्या दौऱ्यावर असणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.