सर्वसामान्यांचा नाश्ताही आता महाग झाला आहे. पोहे, भाजके पोहे, दगडी पोहे, पातळ पोहे, भडंग, मुरमु-यांच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात गेल्या तीन महिन्यांत पोहे, भाजके पोहे, दगडी पोहे, पातळ पोहे, भडंग मुरमु-याच्या दरात किलोमागे सरासरी पाच ते सहा रुपयांनी वाढ झाली आहे. कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे दरवाढ झाली असून, दिवळीपर्यंत दर तेजीत राहणार असल्याचे, व्यापा-यांनी सांगितले.
धानाचे दर वाढले आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगढमधून पोहे, मुरमु-याची आवक होती. मुरमुरे आणि भाजक्या पोह्यांवर यापूर्वी वस्तू आणि सेवा कर आकारण्यात येत नव्हता. आता 25 किलोपर्यंतच्या पिशवीतील पोहे, मुरमु-यांवर GST लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पोहे, मुरमु-यांच्या दरात वाढ झाली आहे. अन्नधान्यावर जीएसटी आकारण्यात आल्यानंतर पाच ते सात टक्क्यांनी दर वाढले आहेत.
( हेही वाचा: न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंह अखेर पोलिसांसमोर हजर )
…तोपर्यंत पोह्यांचे दर तेजीत
बाजारात कच्च्या मालाचा तुटवडा जाणवत आहे. पोह्यांचे उत्पादन गुजरात आणि मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये मोठ्या प्रमाणावर केले जाते. कच्च्या मालाचा तुटवडा जाणवत असल्याने, तेथील उत्पादक तसेच प्रक्रिया उद्योजकांनी दरात वाढ केली आहे. जोपर्यंत कच्चा माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही, तोपर्यंत पोह्यांचे दर तेजीत राहतील, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community