दिवाळीत होणार जिओ 5G चा धमाका, मुकेश अंबानींची मोठी घोषणा

145

रिलायन्स जिओ 5जी इंटरनेट सेवा दिवाळीपासून सुरू होणार असल्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी नुकतीच केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 45 व्या एजीएमला संबोधित करताना, मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स जिओ दिवाळीपर्यंत देशात 5G सेवा सुरू करणार असून पहिली 5G सेवा दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या चार मेट्रो शहरांमधून सुरू केली जाणार आहे. यानंतर 2023 च्या अखेरीस देशाच्या कानाकोपऱ्यात 5G सेवा उपलब्ध होणार आहे. 5G मुळे देशात मोठा बदल होणार असून डिजिटलायझेशनला मोठा हातभार लागणार असल्याचेही मुकेश अंबानी यांनी सांगितले आहे.

(हेही वाचा – न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंह अखेर पोलिसांसमोर हजर)

मुकेश अंबानी पुढे असेही म्हणाले की, रिलायन्स जिओची 5G सेवा ही खरी 5G सेवा असल्याचे सिद्ध होईल. जिओकडे 700 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम असून जे सर्वत्र कव्हरेज प्रदान करणार आहे. रिलायन्स जिओची 5G सेवा सर्वात परवडणारी असेल असेही त्यांनी जाहीर केले. यासह रिलायन्स जिओ 5G सेवांसाठी 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स जिओचे सध्या सर्वाधिक 421 दशलक्ष मोबाइल ग्राहक असून जिओने त्यांच्यासाठी सर्वात मजबूत 4G नेटवर्क तयार केले आहे. 3 पैकी 2 ग्राहक Jio Fiber चा पर्याय निवडत आहेत. Jio ची 5G ही सर्वोत्तम सेवा असेल असेही अंबानींनी सांगितले.

जिओकडून एअरफायबरची घोषणा

त्याचबरोबर जिओकडून एअरफायबरची घोषणा करण्यात आली आहे. जिओ एअरफायबरमध्ये ब्रॉडबॅण्ड इंटरनेटचा स्पीड अधिक असणार आहे. फिक्स्ड ब्रॉडबॅण्डमध्ये भारत येत्या काळात पहिल्या 10 देशांमध्ये असणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, कंपनीने 5G हँडसेट बनवण्यासाठी Google सोबत करार केला आहे. तसेच क्लाउड सक्षम व्यवसायासाठी मायक्रोसॉफ्टशी करार केला आहे. कंपनीने क्वालकॉमसोबतही करार केला आहे. मुकेश अंबानी यांनी घोषणा केली की, Qualcomm 5G पायाभूत सुविधा उभारण्यात जिओला मदत करेल आणि यासाठी रिलायन्स जिओ आणि क्वालकॉमची भागीदारी झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.