मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे बंद राज्यात राजकीय भूकंप घडवणारा ठरला. शिवसेनेतील ४० आमदार फुटून ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपाशी युती करून राज्यात सत्ता स्थापन केली. यानंतर आता भाजपचे नेते निलेश राणे यांनी गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेच्या नेतेपदी नुकतीच ज्यांची निवड करण्यात आली आहे, त्या भास्कर जाधव यांनाही गुवाहाटीचे तिकीट पाहिजे होते, असे म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
‘भास्कर जाधव यांचे ठाकरे प्रेम सध्या वाहू लागले आहे. मात्र गुवाहाटीचे तिकीट जाधवांना पण हवे होते, असा दावा निलेश राणे यांनी केला आहे. तसेच जाधव यांना हे तिकीट का मिळाले नाही, हे आम्हाला चांगले माहीत आहे, त्यामुळे तुम्ही जास्त उडू नका,’ असा इशारा राणे यांनी दिला आहे.
(हेही वाचा कोकणातील गणेशभक्तांना घेऊन ‘मोदी एक्स्प्रेस’ रवाना )
भास्कर जाधव आणि शिवसेना
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या भास्कर जाधव यांना महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर मंत्रिपदाचे वेध लागले होते. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आश्चर्याचा धक्का देत भास्कर जाधव यांना मंत्रिपद देणे टाळले. त्यानंतर जाधव यांनी याबाबतची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. मात्र या नाराजीनंतरही भास्कर जाधव हे निष्ठेने शिवसेनेची खिंड लढवत राहिले. सभागृहात आणि जाहीर भाषणांमधूनही ते भाजपचा आक्रमक समाचार घेत आहेत.
भास्कर जाधवांची नेतेपदी निवड
एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांचा गट स्थापन करून उद्धव ठाकरेंपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यानंतरही भास्कर जाधव हे मात्र ‘मातोश्री’सोबत राहिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नुकतीच त्यांची शिवसेना नेतेपदी निवड केली आहे. अशातच भास्कर जाधव यांनीही बंडासाठी प्रयत्न केल्याचा दावा निलेश राणे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय झाला आहे.
Join Our WhatsApp Community