परवानगी मिळो किंवा न मिळो दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, उद्धव ठाकरेंची भूमिका

155

राज्यातील राजकारण सध्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अद्याप प्रशासनाकडून परवानगी देण्यात आलेली नाही. या दसरा मेळाव्याचा सोहळा शिंदे गटाकडून हायजॅक करण्यात येणार असल्याच्या चर्चा देखील रंगताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर परवानगी मिळू दे किंवा न मिळो शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावरच होणार, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज्यभरातील कानाकोपऱ्यातून शिवतीर्थावर शिवसैनिक हजेरी लावत असतात. यंदाही शिवतीर्थावर शिवसैनिकांनी येण्यास सुरूवात केली आहे. मात्र महापालिकेने अद्याप कोणतीही परवानगी दिलेली नाही. हा तांत्रिक मांत्रिक भाग असेल तो ते बघून घेतील मात्र शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावरच होणार असल्याची ठाम भूमिका उद्धव ठाकरे मांडली आहे.

(हेही वाचा – National Sports Day 2022: “भारतभर खेळांची लोकप्रियता वाढत राहिली पाहिजे”)

दरम्यान, गणेशोत्सवानंतरच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी दिली आहे. शिवसेनेने या दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्कमधील परवानगीसाठी दोनदा परवानगीसाठी पत्र दिले, पण अद्यापही महापालिकेने याबाबत कोणताही निर्णय न देता हा विषय स्थगित ठेवला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.