येत्या बुधवारी ३१ ऑगस्टला लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात फळांना मोठी मागणी वाढली आहे. तसेच सध्या घाऊक बाजारात फळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. मागणी जास्त असल्याने डाळिंब, पेरू, पपई, कलिंगड, सीताफळ आणि खरबुजाच्या किमतीत वाढ झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
( हेही वाचा : हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेचे जाळे उभारणारा हा ठरला जगातील पहिला देश!)
सफरचंदांचा हंगाम सुरू
भारतीय सफरचंदांचा हंगाम सुरू असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात सफरचंद दिसत आहेत. तसेच हिमाचलमधून येणाऱ्या सफरचंदांची आवक सुद्धा बाजारात वाढली आहे. त्यामुळे फक्त सफरचंदाचे दर आवाक्यात आहेत. घाऊक बाजारात अगदी ६० रुपये किलोपासून पुढे १०० रुपये किलोपर्यंत सफरचंद उपलब्ध असल्याचे मार्केट यार्डातील व्यापारी युवराज काची यांनी सांगितले.
डाळिंब, सीताफळ, संत्री, मोसंबीची आवक वाढली आहे. गणेशोत्सव असल्याने बाजारात फळांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गणपतीच्या दर्शनासाठी जाताना गणेशभक्त फळांची आवर्जून खरेदी करतात. त्यामुळे या दिवसांत फळांची मागणी वाढते. राज्याच्या विविध भागांतून इतर फळांचीही आवक सुरू आहे. चिकू, पेरू, टरबूज थोड्या-फार प्रमाणात पाहायला मिळत आहेत.
फळांचे भाव
डाळिंब – ४० ते १५० रुपये किलो
पपई – १५ ते ३५ रुपये
अननस – ७० ते २७० रुपये
पेरू – २० रुपये किलो
मोसंबी – १२० ते २२० रुपये
पेरू – २० रुपये