मुरुड येथील साई रिसॉर्ट पाडण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आला आहे. केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे शासकीय पद्धतीने हे रिसॉर्ट पाडले जाईल, असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी रिसॉर्टवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी थेट रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. हे रिसॉर्ट पाडण्याची मागणी किरीट सोमैया करत होते.
रिसॉर्टवर कारवाई करण्याची प्रक्रिया लवकरच
यासंबंधी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील म्हणाले की, हे रिसॉर्ट अनिल परब यांचेच आहे असा उल्लेख कुठे केला गेला नाही. त्यामुळे मुरुड येथील हे रिसॉर्ट आता अल्पावधीतच जमिनदोस्त होणार आहे. मुरुड येथील वादग्रस्त असलेल्या साई रिसॉर्टबद्दल सोमवारी, ८ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला जिल्हास्तरीय कोस्टल झोन मॉनिटरिंगची कमिटीचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी उपस्थिती होते. केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे आणि शासकीय पद्धतीने हे रिसॉर्ट पाडले जाणार आहे. यासंबंधीची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असून लवकरच कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. साई रिसॉर्ट बरोबरच येथील सी कॉन रिसॉर्टही जमिनदोस्त होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली आहे.
Join Our WhatsApp Community