मुंबईतील रुग्णालयांमधील ‘आरे’च्या दुधाचा पुरवठा बंद

140

‘आरे’च्या दुधाचा पुरवठा शासकीय खरेदी दरात करावे का, या वादात मुंबईतीळ शासकीय दूध पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. फेब्रुवारीपासून आरे केंद्राचा दूध पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यानंतर आता महापालिका, खासगी रुग्णालये आणि शासकीय रुग्णालयांना आरेचा दूध पुरवठा सोमवार, २९ ऑगस्ट रोजी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये रुग्णांना विशेषतः नवजात बालकांना दूध मिळणार नाही, त्यांची गैरसोय होणार आहे.

१६०० आरे स्टॉलचे खासगीकरण करण्याचा डाव 

जरी आरे दूध संस्थेवर राज्य सरकार बंदीची आणणार असेल, तरीही या आरेच्या दुधाला आजही मुंबईमध्ये चांगली मागणी आहे, मात्र दूध उपलब्ध होत नसल्याने दुधाचे वितरण थांबले आहे. ही बाब विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणली होती. त्यानंतरही आता महानगरपालिका रुग्णालये, खासगी रुग्णालये व शासकीय संस्थांना होणारा आरे दुधाचा पुरवठा अचानक बंद करण्यात आला आहे. बृहन्मुंबई दूध योजनेच्या तीन दुग्धशाळा उपलब्ध असून मुंबईतील १६०० दूध केंद्राचे मोठे नेटवर्क आहे, तरीही हे दूध वितरित झाले नाही. बृहन्मुंबई दूध योजनेची स्थावर मालमत्ता व मुंबईभर असलेले १६०० आरे स्टॉल धनदांडग्यांना हस्तांतर करण्याचा डाव आहे का, अशी शंका येत आहे. परंतु ५० वर्षांपासून ज्या आरे स्टॉलधारकांनी आपले स्टॉल सांभाळले, तसेच कामगारांनी दुग्धशाळा चालवून मुंबईच्या सेवेत भर टाकली आहे. त्यामुळे बृहन्मुंबई दूध योजनेच्या दुग्धशाळा बंद होऊन देणार नाहीत. त्यासाठी कामगार संघटनाच सक्रिय झाल्या आहेत.

(हेही वाचा मोहित कंबोज यांच्या तक्रारीवरून विद्या चव्हाण अडचणीत)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.