महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

118

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२२ चे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात येतील.

( हेही वाचा : बेस्ट बसमध्येही ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना एसटी प्रमाणे मोफत प्रवास देण्याची भाजपची मागणी)

तीन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याच्या दामुनाईकतांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक शशिकांत कुलथे आणि याच जिल्ह्यातील पारगाव जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ बाळके यांना तसेच, मुंबईतील छत्रभूज नरसी मेमोरियल स्कुलच्या मुख्याध्यापिका कविता संघवी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत.

देशातील ४६ शिक्षकांना हा मानाचा पुरस्कार

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतेच वर्ष २०२२ च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली आहे. देशातील एकूण ४६ शिक्षकांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला असून महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा यात समावेश आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या औचित्याने येथील विज्ञान भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.