मुंबईतील आयपीएस अधिकारी बनले आता सायबर गुन्हेगारांचे ‘टार्गेट’

130
मुंबईच्या पोलीस आयुक्त पाठोपाठ आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांचा गणवेशातील फोटोचा वापर करून ‘अमेझॉन गिफ्ट’ कार्डचा मेसेज व्हाट्सअॅपवर पाठवला जात आहे. सहपोलीस आयुक्त पडवळ यांच्याकडून असा कुठलाही मेसेज पाठवण्यात आलेला नसून या मेसेजला प्रतिसाद देऊ नये अथवा आर्थिक व्यवहार करू नये, असे आव्हान मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्तांचा फोटो लावून दिशाभूल

सायबर गुन्हेगारांकडून आता मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्य केले जात असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मागील आठवड्यात अनोळखी व्हाट्सअॅप क्रमांकावर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचा फोटो डीपीला लावून अनेकांना मेसेजस पाठवण्यात आले होते, त्यात ‘अमेझॉन पे ई- गिफ्ट विथ १०,००० व्हल्यू’ मागणी करण्यात आली होती.

मेसेजस आल्यास त्याला प्रतिसाद देऊ नये

दरम्यान असाच प्रकार मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांच्याबाबतीत घडला आहे. अनोळखी व्हाट्सअँप क्रमांकाच्या डीपीवर पडवळ यांचा गणवेशातील फोटो लावून अमेझॉन गिफ्ट कार्ड संदर्भात मेसेजस पाठविण्यात येत आहे. मुंबई पोलिसांकडून आव्हान करण्यात येत आहे की, या प्रकारचे मेसेजस आल्यास त्याला प्रतिसाद देऊ नये, तसेच आर्थिक व्यवहार करू नये, असे सांगण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.