ऑगस्ट महिन्याच्या दुस-या आठवड्यात गडचिरोलीत नवा हत्तींचा कळप दाखल झाला आहे. या कळपात ३० हत्तींचा समावेश आहे. गडचिरोलीत मुक्कामाला आलेले हत्ती यंदाच्यावेळी सहा ते आठ महिने राहतील, असा अंदाज अगोदरच वर्तवला होता. कळपात सात हत्तींचे पिल्लू असल्याचे वनविभाग आणि प्राणीप्रेमी संस्थांनी थर्मल ड्रोनच्या साहाय्याने घेतलेल्या प्रतिमेतून दिसून आले आहे.
आता या कळपाचा संचार असलेल्या भागांतील थर्मल ड्रोनच्या साहाय्याने काढलेल्या प्रतिमा वन्यजीवप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहेत. रविवारी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी गडचिरोली जिल्ह्याला भेट देत वनाधिका-यांशी हत्तीच्या संचारमार्गाची माहिती घेतली. गेल्या वर्षीही हत्तींचा कळप गडचिरोलीत मुक्कामाला आला होता. त्यावेळी पाच महिने हत्तींचा कळप गडचिरोलीत राहिला होता. त्यामुळे यंदाच्या हत्तींच्या मोठ्या संख्येने आलेल्या नव्या कळपाला काही बाधा होणार नाही, यासाठी केंद्रीय राखीव पोलीस रक्षकांची मदत वनविभागाने घेतली आहे. बांबूच्या लागवड क्षेत्रात हत्तींचा कळप राहत आहे. त्यामुळे बांबू पिकाच्या नुकसानभरपाईची रक्कम शेतक-यांना तातडीने देण्याच्या सूचना प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी केल्या.
( हेही वाचा: राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार UPSCचे प्रशिक्षण )
Join Our WhatsApp Community