काॅंग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी काॅंग्रेसवर सोमवारी घणाघाती हल्ला चढवला. आजारी काॅंग्रेसला प्रार्थनेची नाही, तर औषधपाण्याची गरज असून, दुर्दैवाने हे औषधोपचार डाॅक्टरांऐवजी कंपाऊंडर करत आहेत, असे ते म्हणाले. पक्ष सुरळीत करण्यासाठी नेतृत्वाकडे वेळ नाही. काॅंग्रेस राज्यांमध्ये असे नेते देतेय, जे लोकांना पक्षाशी जोडण्याऐवजी संघटना सोडायला लावत आहेत, असेही आझाद यांनी पक्ष नेतृत्वावर हल्लाबोल करताना म्हटले.
विधानसभा निवडणुकीची कधीही घोषणा होऊ शकते. आपण लवकरच पक्ष स्थापन करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. निवडणुकीनंतर युतीबाबत विचारले असता ते म्हणाले की, इतरही पक्ष आहेत.
( हेही वाचा: अनिल परबांना मोठा धक्का, अखेर साई रिसॉर्ट पाडण्याचे ठरले…. )
राहुल यांची पात्रता नाही
राहुल गांधी यांना राजकारणात रस नाही. त्यांच्यात योग्यताही नाही. आम्ही त्यांना नेता बनवण्याचा प्रयत्न केला. बरेच, प्रयत्न केले. मात्र, त्यांच्याकडे राजकारण करण्याची क्षमताच नाही. मुळात ते याबाबत गंभीर नाहीत, असाही आरोप त्यांनी केला.
मला भाग पाडले
मला पक्ष सोडण्यास भाग पाडण्यात आले, G 23 नेत्यांनी पत्र लिहिल्यापासून त्यांना माझ्यापासून त्रास आहे. मला कोणी काही बोलू नये, कोणी काही विचारु नये, असे त्यांना वाटते. अनेक बैठका झाल्या. त्यांनी एकही सूचना स्वीकारली नाही, असे आझाद यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community