मेट्रो- 3 ची शिंदे- फडणवीसांच्या उपस्थितीत ट्रायल चाचणी; पहा व्हिडीओ

137

मुंबईत मेट्रो- 3 चा ट्रायल रन सोहळा नुकताच झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेट्रो-3 चा शुभारंभ करण्यात आला. सारीपूतनगर ते मरोळ नाका येथे ट्रायल रन घेण्यात आली.

मेट्रो -3 मुळे काय होणार फायदा?

  • मुंबई मेट्रो लाईन-3 ट्रेन्स आठ डब्यांच्या आहेत. सुरुवातीपासूनच वाढत्या प्रवाशांची गरज पूर्ण करतील
  • 75 टक्के मोटारजेशनमुळे गाड्यांच्या धावण्याची कार्यक्षमता उत्तम राहील.
  • रिजनरेटिव्ह ब्रेकिंगमुळे सुमारे 30 टक्के विद्युत ऊर्जेची बचत होईल. त्याशिवाय चाकांची तसेच ब्रेक ब्लाॅक्स इत्यादी उपकरणांची झीज देखील कमी होईल.
  • मेट्रो ट्रेनच्या डब्यांची रुंदी 3200 मीमी असून, उभे आणि बसलेल्या स्थितीत अंदाजे 2400 प्रवासी एका गाडीतून प्रवास करु शकतील.
  • मेट्रो डब्यांमध्ये वातानुकूलन यंत्रणेअंतर्गत कार्बन डाय ऑक्साईड आणि आद्रतेसाठी स्वयंचलित नियंत्रण प्रणाली आहे. त्यामुळे सर्व हवामान परिस्थितीमध्ये प्रवाशांना उत्तम आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल.

( हेही वाचा: दसरा मेळाव्यावरुन ठाकरे गट – शिंदे गटात रस्सीखेच; मनसेने लगावला टोला )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.