फडणवीसांच्या भेटीनंतर योगगुरू रामदेव बाबा मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला, काय झाली चर्चा?

135

योगगुरू रामदेव बाबा यांनी सोमवारी सागर बंगल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यानंतर मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रामदेव बाबांनी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या नंदनवन निवासस्थानी त्यांनी ही सदिच्छा भेट घेतली. या भेटीमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर व्यापक स्वरूपात चर्चा झाल्याचे रामदेव बाबांनी सांगितले.

हिंदुत्व आणि शिवसेना टिकवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीमध्ये राहणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली. त्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून जे लोक समाजकारण करतात त्यांना आपलंस करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपने पहिलेपासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यातून शिंदे गट आणि भाजपची युती झाल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर योगगुरू रामदेव बाबा यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दरम्यान, फडणवीसांची भेट घेतल्यानंतर रामदेव बाबा यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. हिंदुत्वाचे खरे पुरस्कर्ते कोण, या प्रश्नाचं उत्तर जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच पक्ष पुढे सरसावले आहेत त्यामुळे या दोन बड्या नेत्यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

(हेही वाचा – ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली फसवणूक! Google ने दिला सावधतेचा इशारा)

येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रामदेव बाबा आणि भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांशी झालेली ही भेट महत्त्वापूर्ण मानली जात आहे. या दोघींच्या भेटीत नेमके काय झाले, यावर बोलताना रामदेव बाबा म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदु धर्म, सनातन धर्माचे गौरवपुरुष आहेत. आपल्या राजधर्मासोबत ते सनातन धर्मही प्रामाणिकपणे निभावत आहेत. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आम्ही आलो आहोत. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आमचे आत्मीयतेचे संबंध होते. शिंदे हे बाळासाहेबांचे मानस, अध्यात्मिक आणि राष्ट्रीय उत्तराधिकारी आहेत, या भूमिकेतून आम्ही पाहतो. त्यामुळे या राजधर्मासोबत सनातन धर्माच्या प्रतिष्ठेसाठीही प्रयत्न करा, अशी विनंतीही त्यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.