हा ऐतिहासिक असा क्षण आहे. मुंबईची नव्याने जी लाइफलाइन तयार होत आहे त्या मेट्रो 3 च्या पहिल्या ट्रेनचे टेस्टिंग केले आहे. यशस्वीरित्या हे टेस्टिंग झाले आहे. आता ही मेट्रो धावण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. हा सिग्नलच आपण दिला, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे. मेट्रो-3 च्या पहिल्या ट्रेनची चाचणी मंगळवारी घेण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केली.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी सर्वात आधी कोणते काम केले असेल तर ते म्हणजे या प्रकल्पातील सर्व अडथळे दूर केले. त्यामुळे आता यामध्ये अडचणी राहिलेल्या नाहीत. काही आल्याच तर त्या आम्ही दूर करु, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.
( हेही वाचा: दसरा मेळाव्यावरुन ठाकरे गट – शिंदे गटात रस्सीखेच; मनसेने लगावला टोला )
…म्हणून प्रकल्पाचा खर्च वाढला
कांजूरमार्गला स्टेशन केले असते, तरी या ठिकाणची जागा मोकळी होत होती, असे काही नाही. यासंबंधी मुंबईकरांच्या हिताचा निर्णय तुम्ही घेतला, त्याबद्दल अभिनंदन, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यात राजकारण झाले. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्चही वाढला, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ज्यावेळी या 40 किलोमीटरवर ट्रेन धावेल त्यावेळी आत्मिक समाधान मिळेल, असेही फडणवीस म्हणाले.
Join Our WhatsApp Community