राज्यातील सध्याच्या घडीच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं विधान केले आहे. यावेळी मी सत्तेची कोणतीही जबाबदारी घेणार नाही. मी देखील 82 व्या वर्षी पंतप्रधान होण्याचा कित्ता गिरवणार नाही, असे ते म्हणाले. एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान पद आणि महाविकासआघाडी एकत्र निवडणूक लढण्यासंदर्भात भाष्य केले आहे.
(हेही वाचा – गौतम अदानी जगातील पहिल्या 3 श्रीमंतांमध्ये स्थान मिळवणारे पहिले आशियाई)
शरद पवारांनी केलेल्या या विधानानंतर महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यासह त्यांच्या या वक्तव्यांचा राजकीय अर्थ काढला गेला नाही, तरच नवल! दरम्यान, महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यास शरद पवार यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे आता शिवसेना फुटल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर तीन पक्षांच्या आघाडीचे काय होणार, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे शरद पवारांनी केलेले वक्तव्य महत्त्वूर्ण मानले जात आहे.
काय म्हणाले शरद पवार
मी कोणत्याही प्रकारे सत्तेत सहभागी होणार नाही. तसेच मी सत्तेची जबाबदारीही घेणार नाही. मोरारजी देसाईप्रमाणे मी ८२ व्या वर्षी सत्तेची जबाबदारीही घेणार नाही. ८२ व्या वर्षी पंतप्रधान होण्याचा कित्ता मी गिरवणार नाही. तसेच, आगामी निवडणुका महाविकासआघाडी म्हणून एकत्र लढावी, असे आमचे मत आहे, पण त्यावर निर्णय झालेला नाही. आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरे जावे का याची चाचपणी करत आहोत, पण अजूनही निर्णय झालेला नाही. समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवे, असे पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community