Meta आणि Jio प्लॅटफाॅर्म्सनी सोमवारी Whatsapp वर प्रथमच एंड टू एंड खरेदीच्या अनुभवाच्या उद्घाटनाची घोषणा केली. येथे ग्राहक त्यांच्या व्हाॅट्सअॅप चॅटवर जिओ मार्टवरुन खरेदी करु शकतात. जागतिक दर्जाचा प्रथम अनुभव असलेल्या जिओ मार्टवरुन खरेदी करु शकतात. जागतिक दर्जाचा प्रथम अनुभव असलेला जिओ मार्ट ऑन व्हाॅट्सअॅप भारतातील वापरकर्त्यांना आणि आधी कधीही ऑनलाइन खरेदी न केलेल्या लोकांना जिओ मार्टच्या संपूर्ण किराणा कॅटलाॅग पाहणे, कार्टमध्ये वस्तू टाकणे आणि खरेदी पूर्ण करण्यासाठी प्रदान करणे हे सर्व व्हाॅट्सअॅप चॅटमधून बाहेर न पडता करता येईल.
( हेही वाचा: धक्कादायक: NCRB 2021 च्या रिपोर्टनुसार देशात सर्वाधिक आत्महत्या ‘महाराष्ट्रात’ )
फक्त हाय पाठवून करु शकता खरेदी
मेटाचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक पोस्टमध्ये मत व्यक्त केले की, आम्ही भारतात जिओ मार्टसोबत आमची भागीदारी सुरु करण्यास उत्सुक आहोत. Whatsapp वर हा आमचा पहिलाच एंड टू एंड शाॅपिंग अनुभव आहे. लोक आता चॅटिंग करत जिओ मार्टवरुन किराणा सामान खरेदी करु शकतात. व्हाॅट्सअॅपवरील जिओ मार्टचा अनुभव लाखो भारतीयांसाठी ऑनलाइन शाॅपिंग सुलभ आणि सोयीस्कर असणार आहे. ग्राहक व्हाॅट्सअॅपवर जिओ मार्ट नंबरवर फक्त हाय पाठवून व्हाॅट्सअॅपवरुन जिओ मार्टवर खरेदी करु शकतात.
Join Our WhatsApp Community