ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्त करत आझाद यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली. पण आता आझाद हे काँग्रेसला आणखी मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसमधील तब्बल 51 नेते हे काँग्रेसचा हात सोडणार असल्याचे सांगण्यात येत असून हे सर्व नेते लवकरच राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
काँग्रेसमधील हे 51 नेते आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वातील पक्षात सामील होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या नेत्यांमध्ये जम्मू-काश्मीरमधील वरिष्ठ नेत्यांचा सहभाग असल्याचे समजते. जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री तारा चंद,माजी मंत्री माजिद वानी,मनोहरलाल शर्मा यांचाही यात सहभाग आहे.
(हेही वाचाः मनसे-भाजप युती होणार? राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले)
हे नेते राजीनामा देण्याची शक्यता
या नेत्यांसोबतच जम्मू-काश्मीर काँग्रेसचे सरचिटणीस बलवान सिंह,माजी मंत्री घारु चौधरी, गुलाम हैदर मलिक, विनोद शर्मा, विनोद मिश्रा, नरिंदर शर्मा, परविंदर सिंह, आराधना अंदोत्रा, संतोष मनहास, संतोष मनजोत्रा, वरुण मंगोत्रा, रेहाना अंजूम, रजपौल भारद्वाज, तीरथ सिंह, नीरज चौधरी, सरनाम सिंह, राजदेव सिंह, अशोक भगत, अश्विनी शर्मा, बद्री शर्मा, जगतार सिंह, दलजित सिंह, मदनलाल शर्मा, काली दास, करनेल सिंह, करण सिंह, गोविंद राम शर्मा, रामलाल भगत, केवल कृष्ण, देवेंद्र सिंह बिंदू, कुलभूषण कुमार यांसारखे आणखी काही नेते काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे समजत आहे.
Join Our WhatsApp Community