रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कारवाई; 43 लाख रुपयांची तिकिटे जप्त, 6 जणांना अटक

147

1.3 अब्जपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशाला सेवा पुरवणाऱ्या भारतीय रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीला मोठी मागणी आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय रेल्वेने क्षमता वाढवूनही मागणी-पुरवठ्यातील तफावत वाढली आहे. मागणी-पुरवठ्यातील या तफावतीमुळे अनेक दलाल सक्रिय झाले असून ते विविध मार्गांचा वापर करून तिकिटे आरक्षित करतात आणि नंतर ती गरजूंना चढ्या दराने विकतात. रेल्वे तिकिटांचे ऑनलाइन आरक्षण करण्यासाठी बेकायदेशीर सॉफ्टवेअरचा वापर केला जात असून सर्वसामान्यांसाठी आरक्षित तिकिटांच्या उपलब्धतेवर विपरित परिणाम झाला आहे. रेल्वे तिकिटांची अवैध खरेदी आणि विक्री करणाऱ्या दलालांविरोधात रेल्वे सुरक्षा दल “ऑपरेशन उपलब्ध” या सांकेतिक नावाखाली सातत्याने कठोर कारवाई करत आहे.

(हेही वाचा – मुंबई गुन्हे शाखेकडून कॉल सेंटरचा पर्दाफाश! 17 महिलांची सुटका, मालकाला अटक)

अलीकडेच गुप्तचर यंत्रणा आणि डिजिटल माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा दलाला 8.5.2022 रोजी राजकोटच्या मन्नन वाघेला (ट्रॅव्हल एजंट) याला पकडण्यात यश आले. तो COVID-19 या बेकायदेशीर सॉफ्टवेअरचा वापर करून मोठ्या प्रमाणात रेल्वे तिकीटे आरक्षित करत होता. त्यानंतर वाघेला याने दिलेल्या माहितीच्या आधारे कन्हैया गिरी ( COVID-X, ANMSBACK, BLACK TIGER इ. अवैध सॉफ्टवेअर्सचा विक्रेता ) नावाच्या व्यक्तीला 17.07.2022 रोजी मुंबईतून अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान, गिरीने सत्य परिस्थिती सांगत यातले इतर सहयोगी आणि वापी इथला ऍडमिन /डेव्हलपर अभिषेक शर्मा यांची नावे उघड केली. त्यांना 20.07.2022 रोजी अटक करण्यात आली होती.

अभिषेक शर्माने या सर्व बेकायदेशीर सॉफ्टवेअर्सचा ऍडमिन असल्याची कबुली दिली. अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे, अमन कुमार शर्मा, वीरेंद्र गुप्ता आणि अभिषेक तिवारी या 3 आरोपींना अनुक्रमे मुंबई, वलसाड (गुजरात) आणि सुलतानपूर (यूपी) येथून अटक करण्यात आली. रेल्वे सुरक्षा दल या प्रकरणी आणखी काही संशयितांचा शोध घेत आहे.

या प्रकरणी या सर्व आरोपींवर कायदेशीर कारवाई सुरू असताना 43,42,750/- रुपयांची 1688 ज्यावर प्रवास सुरू करता आला नाही, ती जप्त करण्यात आली. यापूर्वीही, त्यांनी 28.14 कोटी रुपयांची तिकिटे खरेदी केली आणि ती विकून मोठ्या प्रमाणावर कमिशन मिळवले होते. यावरून हे दिसून येते की किती प्रमाणात काळा पैसे येतो ज्याचा वापर इतर अवैध कारवायांसाठी देखील केला जाऊ शकतो. आरोपींनी उघड केलेली माहिती एका पथकाद्वारे तपासली जात आहे, यापुढेही ही कारवाई सुरु राहील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.