बाबरी विध्वंस आणि गुजरात दंगलीबाबत सर्वोच्च न्यायलयाचा मोठा निर्णय

164

बाबरी मशीद विध्वंस आणि गुजरात दंगलीशी संबंधित सर्व खटले बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. यावेळी न्यायालयाने असे सांगितले की, गुजरात दंगलीबाबत अनेक याचिकांना आता काही अर्थ नाही. त्यामुळे त्यावर सुरू असलेली कार्यवाही थांबवण्यात यावी. तर गुजरात दंगलीतील 9 पैकी 8 प्रकरणांची ट्रायल पूर्ण झाली आहे. याशिवाय न्यायालयाने बाबरी मशिद विध्वंस प्रकरणी अवमान याचिकाही बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने 6 डिसेंबर 1992 रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्येतील बाबरीचा ढाचा पाडण्याशी संबंधित अवमान याचिकाही बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने वकील प्रशांत भूषण आणि पत्रकार तरुण तेजपाल यांच्याविरुद्ध अवमानाची कारवाई बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी दोघांनीही माफी मागितली आहे. 2009 मध्ये एका मुलाखतीत प्रशांत भूषण यांनी माजी आणि विद्यमान न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

(हेही वाचा – मुंबई गुन्हे शाखेकडून कॉल सेंटरचा पर्दाफाश! 17 महिलांची सुटका, मालकाला अटक)

या प्रकरणी युक्तिवाद करताना कपिल सिब्बल म्हणाले की, प्रशांत भूषण आणि तरुण तेजपाल यांनी माफी मागितली आहे. त्यामुळे दोघांविरुद्धचा खटला बंद करण्याची मागणी केली. त्यांची ही मागणी न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने मान्य केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.