कोरोनानंतर निर्बंधमुक्त वातावरणात साजऱ्या होणाऱ्या गौरी-गणपती सणासाठी कोकणवासीय सज्ज झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा खासगी गणपतीच्या संख्येत वाढ झाली असून यंदा ६८ हजार ९५२ खासगी बाप्पा विराजमान होणार आहेत. आपल्या लाडक्या बाप्पासाठी लाखो चाकरमानी विशेष एसटीबस, रेल्वे, खासगे वाहनांमधून कोकणात दाखल झाले आहेत. सजावटीचे सामान, भाजीपाला यांनी बाजारपेठा गजबजून गेल्या आहेत. रेल्वेतून उतणाऱ्या चाकरमान्यांना आपल्या मूळ गावी जाता यावे याकरता कोकणातील महत्त्वाच्या स्थानकांमधून एसटी बसची सुविधा करण्यात आली आहे.
( हेही वाचा : एसटी महामंडळाकडून कोकणात २ हजार जादा चालक; कशेडी घाटात विशेष दक्षता )
कोकणवासीय सज्ज
कोकणातील जिल्हा प्रशासन गणेशोत्सवासाठी सज्ज झाले असून गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या आरोग्य तपासणीसाठी बसस्थानक, रेल्वे स्थानक अशा १८ ठिकाणी आयोग्य पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. तसेच जवळपास दीड लाख गणेशभक्त कोकणाकडे होणार रवाना होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. सर्व घाटमार्गावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन सिंधुदुर्गाच्या जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. एकंदरीतच लाडका गौरी गणपती उत्सव साजरा करण्यासाठी कोकणवासीय सज्ज झाले आहेत.
Join Our WhatsApp Community