अण्णा हजारेंच्या ‘त्या’ पत्रानंतर अरविंद केजरीवाल सोशल मीडियात होत आहेत ट्रॉल

165

दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्यामध्ये दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे एकेकाळी अण्णा हजारेंसोबत भ्रष्टाचार विरोधी आंदोलन करणा-या अरविंद केजरीवाल आणि सिसोदिया यांच्यावर अण्णांनी जोरदार हल्ला चढवला आहे. अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. त्यानंतर केजरीवाल हे सोशल मीडियात बरेच ट्रॉल होऊ लागले आहेत.

काय म्हटले अण्णा हजारेंनी पत्रात?

लोकांचे जीवन उद्ध्वस्त करणारे आणि महिलांवर परिणाम करणारे दारू धोरण तुमच्या सरकारने आणले आहे. तुमच्याकडून तमाम जनतेला फार अपेक्षा होत्या पण राजकारणात प्रवेश केल्यावर आणि दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यावर तुम्हाला आदर्श विचारसरणीचा विसर पडल्याचे दिसत आहे. दारुच्या नशेप्रमाणेच सत्तेचीही नशा असते. तुम्हालाही अशा सत्तेची गुंगी चढली आहे, अशा शब्दांत अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केरजीवाल यांना सुनावले आहे.

(हेही वाचा ‘तुम्हालाही सत्तेची नशा चढली आहे’, केजरीवालांना अण्णा हजारेंनी सुनावले)

काय म्हणतात नेटकरी?

हिंदी चित्रपट दिग्दर्शक अशोक पंडित म्हणाले की, एकीकाळच्या आपल्या चेल्याला अण्णा हजारे यांनी पत्र लिहिले आहे, ज्याने त्यांचा वापर करून त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला होता. त्यांना आता मद्य धोरणाबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आपची विश्वासाहर्ता, अण्णा हजारे यांनी बटण दाबले, असे म्हणत नेटक-याने नोएडा येथील बेकायदेशीर ट्वीन टाॅवर जे पाडले, त्याचा व्हिडीओ ट्वीट केला.

अजय ठाकूर म्हणतात की, अनेक बुद्धीवंतांनी आधीच पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे की, तुम्ही त्यांना शहरी नक्षलवादी म्हणून बोलवा. अण्णा हजारे नेमके तेच करत आहेत, असे म्हटले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.