‘पवार कुटुंबाच्या रेशन कार्डवरील प्रत्येकाची चौकशी व्हायला हवी’, भाजप नेत्याची मागणी

125

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून अनेकदा आरोप करण्यात येतात. आता पवारांचे नातू रोहित पवार यांच्या एका कंपनीची चौकशी करण्यात येत असतानाच पडळकर यांनी पवार कुटुंबीयांवर निशाणा साधला आहे. पवार कुटुंबीयांच्या रेशन कार्डवरील सर्वांची चौकशी व्हायवा हवी, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

पवार संविधानापेक्षा मोठे नाहीत

रोहित पवार यांच्या एका कंपनीतील भ्रष्टाचाराबाबत तपास यंत्रणांकडून चौकशी होणार आहे. त्यामुळे भाजप नेत्यांच्या निशाण्यावर सध्या रोहित पवार आले आहेत. त्यातच पवार कुटुंबीयांवर पडळकर यांनी टीका केली आहे. पवार कुटुंबाच्या रेशन कार्डवर ज्या व्यक्ती आहेत त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. ही चौकशी झाल्यानंतरच पवार कुटुंबीयांचा खरा चेहरा लोकांच्या समोर येईल. पवार हे संविधानापेक्षा मोठे नाहीत त्यामुळे आयकर विभाग,ईडी अशा सर्वच तपास यंत्रणांकडून त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पडळकरांनी केली आहे.

(हेही वाचाः ‘तुम्हालाही सत्तेची नशा चढली आहे’, केजरीवालांना अण्णा हजारेंनी सुनावले)

पवारांची भाजपवर टीका

दरम्यान, रोहित पवार यांच्यावर होणा-या आरोपांबाबत शरद पवार यांनी भाजपला टोला लगावला आहे. रोहित पवार यांचे काय होणार,याची भविष्यवाणी भाजप नेत्यांनी आधीच केली आहे. या प्रकरणाची अजूनपर्यंत कोणतीही चौकशी झाली नाही. आपल्याला अधिकृत माहिती मिळाल्याचे भासवत त्याबाबत भाष्य करणारा एक वर्ग सध्या आपल्या महाराष्ट्रात निर्माण झाला आहे, असा टोला पवारांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.