पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर दणदणीत मात करत रोहित शर्माने कर्णधार म्हणून भारतासाठी तिसावा विजय साजरा केला. यासोबतच त्याने विराट कोहलीच्या विक्रमाशीही बरोबरी केली. 2017 ते 2021 या कालावधीत टी-20 चे कर्णधारपद भूषवताना विराटने एकूण 50 पैकी 30 सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला होता. सध्या या यादीत रोहित आणि विराट संयुक्तपणे दुस-या स्थानी असून, अव्वल क्रमांकावर 41 विजयांसह भारताचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी विराजमान आहे. भारताला सर्वाधिक T- 20 सामने जिंकून देणा-या कर्णधारांचा हा आढावा.
1. महेंद्रसिंह धोनी
- सामने -72
- विजय-41
- जिंकण्याची टक्केवारी-59.28
2.रोहित शर्मा
- सामने -36
- विजय-30
- जिंकण्याची टक्केवारी- 83.33
( हेही वाचा: WhatsApp वर चॅट करत आता किराणा मालाची खरेदी करता येणार )
3. विराट कोहली
- सामने-50
- विजय-30
- जिंकण्याची टक्केवारी -64.58