रोहिंग्या मुसलमान यामुळे जसा भारत त्रस्त झाला आहे, तसा बांगलादेशही त्रस्त झाला आहे. कारण बांगलादेशात रोहिंग्यांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता बांगलादेश सरकारने लष्कराची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
गुन्हे जवळपास सात पटींनी वाढले
बांगलादेशात रोहिग्या शरणार्थी यांची समस्या सातत्याने वाढत आहे. खरे तर बांगलादेश या रोहिंग्या शरणार्थींना त्यांच्या देशात पाठविण्याचा प्रयत्नही करत आहे. यातच आता गुन्हेगारीला आळा घालण्याच्या दृष्टीने आणि अंमली पदार्थांचे स्मगलिंग रोखण्याच्या दृष्टीने आवश्यकता भासल्यास रोहिंग्या शरणार्थींच्या कॅम्पमध्ये लष्कर तैनात करण्यात येईल, असे बांगलादेशचे गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल यांनी म्हटले आहे. कॉक्स बाजार भागात गेल्या पाच वर्षांत हत्या, लूटमार, बलात्कार, ड्रग्स स्मगलिंग आणि इतरही विविध प्रकारचे गुन्हे जवळपास सात पटींनी वाढले आहेत. महत्वाचे म्हणजे, यापूर्वी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही यासंदर्भात भाष्य केले आहे. त्या अनेक वेळा आपल्या भाषणात पोलीस रिपोर्टचा हवाला देत म्हणाल्या होत्या की, काही रोहिंग्या शरणार्थी गुन्हेगारी प्रवृत्तीचे नेतृत्व करत आहेत आणि ते कॅम्प कट्टरपंथी संघटनांसाठी गड बनले आहेत.
Join Our WhatsApp Community