मुंबईतील महापालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये टेलिकन्सल्टेशन

125

मुंबईतील महानगरपालिकेचे एकूण १९० दवाखाने असून यासर्व दवाखान्यांमध्ये प्रायोगिक स्तरावर ‘टेलि-कन्सल्टेशन’ सुरु करणे. तसेच सुसमन्वय साधण्यासाठी आता अत्याधुनिक व प्रभावी सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये उपचार घेणाऱ्या प्रत्येक रुग्णांवरील उपचारसाठी तज्ज्ञांची मदत घेऊन तिथल्या तिथेच उपचार करण्यात येणार असून सुविधेअभावी कोणत्याही रुग्णाला मोठ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्याची गरज भासणार नाही.

( हेही वाचा : दादर-माहिमच्या बालेकिल्ल्यावर सरवणकरांचे वर्चस्व)

आरोग्य विषयक नवनवीन अत्याधुनिक बाबींची उपलब्धता व अंमलबजावणी यासाठी मुंबई महानगरपालिकेला मार्गदर्शन करून आरोग्य व वैद्यकीय सेवा-सुविधा या सक्षमपणे आणि समर्थपणे नागरिकांना मिळण्याच्यादृष्टीकोनातून महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशांनुसार एका विशेष सल्लागार समितीचे गठन मंगळवारी करण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेत या सल्लागार समितीची पहिली बैठक महानगरपालिका मुख्यालयात मंगळवारी सकाळी आयोजित करण्यात आली होती. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये विविध आजारांच्या प्रतिबंधासाठी करण्यात येणा-या लसीकरणात गुणवत्तापूर्ण वाढ करण्याबाबत तसेच असंसर्गजन्य रोगांचे (NCDs) निदान व उपचार अधिकाधिक प्रभावी करण्याबाबत चर्चा पार पडली.

याशिवाय माता व बाल मृत्यू दर आणखी कमी करण्यासाठी विविध स्तरिय उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याचे मतही यावेळी मांडण्यात आले. याबरोबच प्रसुति-पूर्व व प्रसुति-पश्चात घ्यायची काळजी, याबाबत मुंबईतील विविध स्तरिय कार्यवाहीची अधिकाधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी तसेच मुंबई महानगरपालिका रुग्णालयातील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न कालबद्धरित्या राबवण्याचाही विचार पुढे आला.

सार्वजनिक आरोग्य खात्यात कार्यरत असणा-या डॉक्टर व कर्मचा-यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यास महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असणा-या ‘आशा’ सेविकांचे प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षमीकरण करण्यात येईल. आरोग्य विषयक काही सेवा-सुविधांच्या अंमलबजावणीसाठी विविध कार्पोरेट कंपन्यांच्या सीएसआर निधीचा उपयोग करणे. यासह आरोग्य सेवा-सुविधांच्या सक्षमीकरणासाठी काल-सुसंगत धोरणे तयार करणे, त्यांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी आराखडा, मार्गदर्शक तत्त्वे, मानदंड आणि मानके तयार करणे, आरोग्य विषयक संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार आदींबाबतही विचार करण्यात आला. आवश्यक तेथे अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञान आधारित बाबींचा अधिकाधिक परिणामकारक अवलंब करणे. आणि सक्षमीकरण, तांत्रिक सहाय्य आणि विकेंद्रीत सुव्यवस्थापन साध्य करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला मदत व मार्गदर्शन करणे आदींवरही चर्चा करण्यात आली. या समितीची बैठक ही साधारणपणे दर दोन महिन्यातून एकदा घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.