भाजपामध्ये काही नेते असे आहेत, जे अतिउत्साही होऊन बोलतात आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतात. त्यातील एक आमदार अतुल भातखळकर हे एक आहेत. दररोज राजकीय घडामोडीवर सोशल मीडियावरून भाष्य करताना आमदार अतुल भातखळकर अक्षरशः घायकुतीला येतात, ‘सर्वात आधी मी व्यक्त झालो’ या नादात भातखळकर विरोधी पक्षावर प्रहार करतात. कालपर्यंत भाजप विरोधी पक्षात होता, तेव्हाही भातखळकर महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर आगपाखड करत होते. आता भाजप सत्तेत आहे, त्यामुळे ‘हम करे सो कायदा’ या अविर्भावात अतुल भातखळकर विरोधी पक्षांवर टीका टिप्पणी करत आहेत. ‘सत्ता असल्यामुळे आमच्यावर कोण कारवाई करणार’, अशा भ्रमात राहणाऱ्या आमदार भातखळकर यांना मंगळवार, ३० ऑगस्ट रोजी जबरदस्त धक्का बसला आहे. सोनिया गांधी यांच्यावर टीका केली म्हणून त्यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भातखळकरांना कारवाईला सामोरे जावे लागणार
नॅशनल हेराल्डप्रकरणी सोनिया गांधी यांची ईडीने चौकशी केली आहे. या चौकशीसाठी जेव्हा ईडीने सोनिया गांधी यांना समन्स पाठवले होते, तेव्हा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सोनिया गांधी यांच्या विरोधात ट्विटरवरून आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्यावर कुणीही काही कारवाई करणार नाही, अशा समजमध्ये राहणाऱ्या भातखळकर यांचा हा समज गैरसमज होता, हे दाखवून देणारी घटना घडली आहे. ही पोस्ट केल्यामुळे अतुल भातखळकर यांच्या विरोधात पुणे सायबर पोलिसांकडे लेखी तक्रार दिल्यानंतर अतुल भातखळकर यांच्याविरोधात चक्क गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आमदार भातखळकर यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. संदीप भुजबळ यांनी अतुल भातखळकर यांच्याविरोधात पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती. ट्वीटर अकाऊंटवरुन अतुल भातखळकर यांनी सोनिया गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. भातखळकर यांनी केलेल्या ट्वीटनंतर त्यांच्यावर अनेक काँग्रेस नेत्यांनीही टीका केली होती. आता अतुल भातखळकर यांच्या पोलिसांकडून या पोस्टप्रकरणी चौकशीही केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(हेही वाचा किरीट सोमय्यांवर कारवाई करणारे पोलीस म्हणतात, आम्हाला पश्चात्ताप होतोय)
Join Our WhatsApp Community