गडचिरोलीत वाघाच्या हल्ल्यात एक व्यक्ती ठार, वनविभागाने तातडीने ट्रॅप कॅमेरे लावले

140
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत वाघाच्या हल्ल्यात दोन माणसांचा मृत्यू झाला. आरमोरी आणि वडसा विभागात हे दोन हल्ले झाले आहेत. या दोन्ही ठिकाणी माणसावर हल्ला केलेल्या वाघाला शोधण्यासाठी वनविभागाने ट्रॅप कॅमेरा लावले आहेत. गडचिरोलीतील चार विभागांत तातडीने वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावले आहेत.
2 3

सोमवारची पाहिली घटना

आरमोरी येथे सकाळी साडेसहा वाजता जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी गेलेल्या 45 वर्षीय बळीराम कुंटे यांच्यावर वाघाचा हल्ला झाला. या घटनेबाबत माहिती मिळताच वनविभागाने तातडीने जंगलात शोध मोहीम राबवली. तीन तासांनी बळीराम कुंटे यांचा वनाधिकाऱ्यांना मृतदेह मिळाला.
3 2

मंगळवारची घटना

वडसा येथे पोरला विभागात जंगलात सायंकाळी गुरे चरण्यासाठी गेलेल्या पार्वता सुधरी या 50 वर्षीय महिलेवर वाघाचा हल्ला झाला. काही तासांपूर्वीच वनाधिकाऱ्यांना महिलेचा मृतदेह मिळाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी गडचिरोली जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.
5

वाघाच्या संचार क्षेत्रात जाणे टाळा

दोन्ही हल्ले वाघाच्या संचाराच्यावेळी जंगलात झाले. सायंकाळी आणि भल्या पहाटे जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी तसेच गुरे चारण्यासाठी जाऊ नका, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.