गणेशोत्सवाला बुधवारी 31 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. राज्यभरात गणेशोत्सवाची मोठी धूम पहायला मिळत आहे. गणेशाच्या आगमनाचा एक वेगळाच उत्साह असतो. भाविकांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. याच निमित्ताने जाणून घेऊया मुंबईतील सहा मानाच्या गणेशमंडळांबद्दल.
मुंबईचा राजा गणेशगल्लीचा गणपती
गणेशगल्लीच्या गणपतीची मुंबईचा राजा अशी ख्याती आहे. मुंबईच्या राजाने यंदा काशी विश्वनाथ मंदिराचा देखावा साकारला आहे. मुंबईचा राजा यंदा विश्वकर्मा रुपात पाहायला मिळत आहे. यंदा या गणपतीची मूर्ती तब्बल 22 फूट उंच आहे.
लालबागचा राजा
नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या राजाची जगात ख्याती आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्त जगाच्या कानाकोप-यातून येतात. लालबागचा राजा ज्या ठिकाणी विराजमान होतो त्याच ठिकाणी राजाची मूर्ती साकारली जाते.
खेतवाडीचा राजा
मुंबईचा महाराजा अशी ओळख असलेल्या खेतवाडीची यंदाची गणेशमूर्ती तब्बल 38 फुटांची आहे. हे गणेशमंडळ उंच गणेशमूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. यंदा या मूर्तीसमोर गुरुकुलाचा देखावा साकारण्यात आला आहे.
चिंचपोकळीचा चिंतामणी
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा प्रसिद्ध असतो. बाप्पाच्या आगमनाच्या दोन महिने आधीपासूनच त्याची तयारी सुरु होते.
( हेही वाचा: मुंबईकरांसाठी गणेशोत्सवानिमित्त ‘बेस्ट’ ऑफर; फक्त २० रुपयांत ५० फेऱ्या )
जीएसबी गणपती
मांटुग्यातील जीएसबी सेवा गणेश मंडळाला मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखतात. या मंडळाने यंदा गणेशमूर्ती मंडप आणि इतर साहित्याचा तब्बल 300 कोटींचा विमा उतरवला आहे.
तेजुकाय मेन्शन गणपती
लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर गणेशभक्त तेजुकाय मेन्शन गणपतीचे दर्शन घ्यायला जातात. या मंडळातील गणपतीची मूर्ती अतिशय सुंदर आणि रेखीव असते.
Join Our WhatsApp Community