ब्रिटिशांचा रोष पत्करुन बसवण्यात आलेल्या चांदीच्या गणपतीचा इतिहास माहितीय का?

190

नाशिक शहरातील चांदीचा गणपती खूप लोकप्रीय आहे. 1928 ला ब्रिटीशांचा रोष पत्करुन या गणपतीची स्थापना करण्यात आली होती. त्याच झालं असं की, सार्वजनिक गणेशोत्सव सुरु झाला होता. मात्र, हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी केलेल्या कलेक्टर जॅक्सनच्या वधानंतर 3 वर्ष नाशिकमध्ये तणावाचे वातावरण होते. ब्रिटिशांच्या त्राासामुळे गणेशाची प्रतिष्ठापना करणे अवघड होऊन बसले. मात्र रविवार कारंजावरील नागरिकांनी ब्रिटिशांचा रोष पत्करुन अखेर 1928 साली मिठाईच्या दुकानात गणेशाची स्थापना केली.

नाशिक शहरातील सर्वात जुने मंडळ म्हणून ख्याती असलेले मंडळ म्हणजेच रविवार कारंजावरील चांदीच्या गणपतीचे गणेशोत्सव मंडळ होय. गेल्या 104 वर्षांपासून नाशिककरांचे श्रद्धा स्थान बनलेले आहे. म्हणून नाशिकमधील चांदीचा गणपती हा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो.

असा आहे चांदीच्या गणपतीचा इतिहास

1913 सालापासून लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव व श्री गणेशोत्सव सार्वजनिक रित्या साजरा करायला सुरुवात केली. हळूहळू संपूर्ण राज्यभर गणोशोत्सव जल्लोषात साजरा होऊ लागला. जुन्या नाशिक आणि रविवार कारंजा परिसरातील नागरिकांनी 1917 सालापासून सार्वजनिक गणोशोत्सव साजरा करायला सुरुवात केली. मात्र, ब्रिटिशांनी त्यावेळी हैदोस घातला होता. त्यामुळे रविवार कारंजा मित्र मंडळाला सरकारी रोष पत्करावा लागला. अनेकदा तर मंडळांनी दाखवलेल्या देखाव्यावर पोलीस खात्याने बंदी आणून देखावे दाखवण्यास मनाई केली. त्याचवेळी हुतात्मा कान्हेरे यांनी नाशिकचे ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला. त्यानंतर कार्यकर्त्यांची धरपकड सुरु झाली. त्यानंतर पुढची काही वर्षे मंडळासाठी फारच कठीण गेली.

( हेही वाचा: गणेशमूर्तींचा आक्षेपार्ह आकार, ‘पुष्पा’च्या पेहरावात गणेशमूर्तीमुळे संताप  )

भिशीचे पैसे मोडले अन्….

स्वातंत्र्यानंतर मिठाईच्या दुकानातून रविवार कारंजा मित्र मंडळ नव्या जागेवर गणेशाच्या मूर्तीची स्थापना करु लागले. त्यावेळी शाडूच्या मूर्तीपासून चार ते पाच फुटांची मूर्ती बनवली जात असे. मात्र या मूर्तीपासून पाच ते सहा हजार रुपये खर्च येत असायचा. तसेच विसर्जनालादेखील अडचण व्हायची. म्हणून मंडळाने चांदीची मूर्ती बनवण्याचे सुचवले. यावेळी उपस्थित गणेश भक्ताने आपले भिशीचे सर्व पैसे या चांदीच्या मूर्तीसाठी दान केले. त्याचबरोबर इतरांनीही रक्कम जमा करत 1978 ला पहिल्यांदा 11 किलो चांदीची मूर्ती स्थापन केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.