राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यावरण पूरक गणोशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. मागच्या दोन वर्षानंतर यंदा धडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. 1 जुलै 2022 पासून सिंगल यूज प्लास्टिकचा वापर, उत्पादन आणि वातरण यावर बंदी घालण्यात आली आहे. उत्सवाच्या निमित्ताने मी आपणाला विनंती करतो की या प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण थांबवण्यासाठी आपण निश्चय करुयात आणि सिंगल यूज प्लास्टिकचा दैनंदिन वापर बंद करुयात, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, सिंगल यूज प्लास्टिकचा वापर बंद करुयात आणि पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करुयात, सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.यंदा निर्बंधमुक्त गणोशोत्सव आपण साजरा करत आहोत. गणरायाचे स्वागत करताना महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च श्रीगणेशा करुयात. यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुयात. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण अशा विविध विषयांवर गणेश मंडळांनी जनजागृती करावी, असे आवाहनदेखील एकनाथ शिंदे यांनी केले.
Join Our WhatsApp Communityमुख्यमंत्री @mieknathshinde यांच्याकडून पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!#गणेशोत्सव२०२२ #Ganeshotsav2022 pic.twitter.com/FX0oG5aJuF
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 31, 2022